Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dipti Gogate

Tragedy

4.0  

Dipti Gogate

Tragedy

कसं बांधू मी माझं घर

कसं बांधू मी माझं घर

1 min
222


काबाडकष्ट करायचे

राब राब राबायचे

तरी मी बेघर

कसं बांधू मी माझं घर||१||


जागांचे भाव केवढ्याने वाढले

पगार मात्र आहे तिथे थांबले

त्यातच कोरोनाचा सुरू होता वावर

कसं बांधू मी माझं घर||२||


घरचं भाडं भरताना येतात नाकीनऊ

मुलांसाठी कुठून आणू खेळणी आणि खाऊ

सगळ्याचेच गगनाला भिडले दर

कसं बांधू मी माझं घर||३||


नाही कोणाशी ओळख पाळख

नाही कोणाचा आधार

माझं छोटंसं स्वप्न कसं 

होईल साकार

कोणाला देऊ दोष,कोणावर फोडू खापर

कसं बांधू मी माझं घर||४||


पुढचं चित्र पण कठीणच भासतेय

निराशेचे वातावरण आजूबाजूला दाटतय

शेवटपर्यंत मनात राहील ही सल

कधीच बांधणार नाही का मी घर||५||



Rate this content
Log in