वाईटाचा नाश
वाईटाचा नाश
दुर्जनांचा कधीही विजय होत नसतो
अंतिम विजय हा नेहमी सत्याचाच असतो
सुख शांती प्राप्तीसाठी दैत्याचा करण्यास संहार
देवाने घेतले किती विविध अवतार
अशीच एक कथा आहे, दुर्गेच्या रुपाची
ही कथा आहे, महिषासुरमर्दिनीची
दुष्ट असूर होता, महिषासुर नावाचा
त्याच्या शक्तीमुळे, थरकाप होई साऱ्यांचा
भक्तीसाधनेमुळे ब्रह्माचे लाभले वरदान
शक्तीचा केला दुरुपयोग,होऊन बेभान
त्याच्याशी लढण्यास सज्ज झाली
देवी दुर्गा भवानी
महिषासुराचा वध करून
झाली महिषासुरमर्दिनी
नवरात्रात करू या
देवीचे स्मरण
भय, संकट दूर होई
करू या दुर्गेचे पूजन
