पांढरा रंग
पांढरा रंग
पांढरा रंग म्हणजे शांतता
पांढरा रंग म्हणजे पवित्रता
पांढरा रंग म्हणजे खरेपणा
पांढरा रंग म्हणजे शुद्धता
पांढरा रंग दिसतो जसा ढगात
पांढरा रंग दिसतो हिमालयाच्या बर्फात
पांढरा रंग दिसतो विविध फुलांत
पांढरा रंग दिसतो दुधात- दह्यात
सफेद रंगाचा सच्चेपणा प्रिय आहे देवीला
नवरात्रात स्थान आहे म्हणूनच ह्या रंगाला
