हिरव्या हिरव्या
हिरव्या हिरव्या
हिरव्या हिरव्या झाडांवर
हिरवं हिरवं पान
हिरवं हिरवं रान सगळं
दिसतं किती छान
हिरवा चुडा शोभे
सुवासिनीच्या हातात
तुळशीची पूजा करू
लावू अंगणात
हिरवा रंग चहूकडे
दिसतो निसर्गात
हिरवा रंग म्हणजे
उत्कर्ष आणि भरभराट
