विमान प्रवास
विमान प्रवास
1 min
186
विमान प्रवास हा
जेव्हा सुरू झाला
माणूस आकाशात
जणू पक्षांसारखा उडू लागला
खिडकीतून डोकावताना
सुंदर दिसते धरती
उंच गेल्यावर ढग
फिरतात अवती भवती
बिझनेस मीटिंग असो वा
एखादी छानशी सहल
सुखद आरामदायी
अशी घडे सफर
ना धुराचा त्रास
ना हॉर्नचे आवाज
गाणी ऐकत निवांत बसावे
असा राजेशाही अंदाज
मिटल्या देशांच्या सीमा
घटले शेकडो मैलांचे अंतर
जगभर होतो
सहजपणे वावर
दूरस्थ नातलगांना भेटताना
आनंद होतो किती
जग जवळ आणणारी
अभूतपूर्व अशी प्रगती
