निळा रंग रॉयल ब्ल्यू
निळा रंग रॉयल ब्ल्यू
निळा रंग हा सागराचा
निळा रंग हा आभाळाचा
निळा रंग हा शांततेचा
निळा रंग हा भव्यतेचा
निळ्या रंगाच्या छटामधे
उठून दिसतो रॉयल ब्ल्यू
राजवैभव, संपन्नता
दर्शवतो रॉयल ब्ल्यू
नवरात्रीच्या दिवशी जेव्हा
रॉयल ब्ल्यू परिधान केला जातो
सभोवतालच्या लोकांमध्ये
महासागराचा भास होतो
