भावाची आठवण
भावाची आठवण
1 min
307
सासरी राहून बहीण
काढते भावाची आठवण
लहानपणीच्या गमती जमती
सुख दुःखाचे अनेक क्षण
एकत्र वाढलो
एकत्र खेळलो
एकमेकांची घेतली बाजू
तर कधी एकमेकांवर चिडलो
भावासाठी राखी घेताना
खूप गम्मत वाटायची
त्याच्या कडून काय भेट मिळेल
याची उत्सुकता असायची
प्रत्यक्ष भेट नाही
राखी पाठवते टपालाने
फोन लावते भावाला
विचारपूस करते आपुलकीने
सणाच्या दिवशी भाऊ
जरी समोर नसेल
आहे विश्वास संकटात
तो मदतीला नक्की हजर असेल
