पिवळा रंग
पिवळा रंग
सूर्य देवता प्रसन्न होऊन
किरणांची करत बरसात
सर्व सृष्टीला देत ऊर्जा
सकारात्मकता पसरते जगात
रात्रीचा अंधार जाऊन
प्रकाश पसरे जीवनात
नैराश्य दूर होऊन
उमेद जागते मनात
पिवळी कणसे सोन्यासारखी
डोलू लागती शेतात
सोन्यासारखे पीक येताच
होते भरभराट
पिवळा रंग हा आनंदाचा
पिवळा रंग हा प्रगतीचा
पिवळा रंग हा सौख्याचा
पिवळा रंग हा ऊर्जेचा
