शिक्षक
शिक्षक
अक्षर शिकवण्यापासून
झाली सुरुवात
पुढे तर ज्ञानाचे भांडार
गवसले शाळेच्या आवारात
अनेक शिक्षक शिक्षिका यांनी
विविध विषयांचे ज्ञान दिले
त्याचमुळे पुढचे आयुष्य
सोपे सुलभ झाले
गणिताची वजा बाकी
विज्ञानाचे नियम
भाषेचे व्याकरण
शिकवताना त्यांनी राखला संयम
शिक्षकांमुळेच उत्तम माणूस
घडत असतो
आपण सर्व कायम त्यापुढे
नतमस्तक होतो
