लाल रंग सौभाग्याचा
लाल रंग सौभाग्याचा
1 min
179
लग्न होताच स्त्री चे आयुष्य बदलते
संपतो अल्लडपणा, जबाबदारी पेलायची असते
लाल कुंकू कपाळावर ठळक उठून दिसते
तिच्यासाठी हे महत्त्वाचे सौभाग्य लेणे असते
कुंकू किंवा टिकली विना सुवासिनी अपूर्ण असते
मांग मध्ये सिंदुर अशीही प्रथा असते
लाल रंग हा ऊर्जेचा लाल रंग हा धाडसाचा
लाल रंग हा शुभचिन्हांचा लाल रंग हा सौभाग्याचा
घरात आलेली नववधू जणू लक्ष्मीचं रूप असते
सर्व कुटुंबाच्या भल्यासाठी ती सदैव तत्पर असते
