आनंदाने जगू या
आनंदाने जगू या
1 min
152
नको कुणाचा द्वेष
नको कुणाचा मत्सर
योग्यतेची प्रशंसा करू या
आनंदाने जगूया||१||
जे कोणी असतील गरीब, लाचार
त्यांना देऊ आपण आधार
एकेमकांची मदत करू या
आनंदाने जगू या||२||
नको भांडण तंटा
नकोत उगाचच कुरापती
एकमेकांना समजून घेऊ या
आनंदाने जगू या||३||
निसर्ग भरभरून देतो दान
त्याचा राखू या सन्मान
पर्यावरणाचे रक्षण करू या
आनंदाने जगू या||४||
देशासाठी किती ते झिजले
कित्येकांनी प्राण त्यागले
एकोप्याने राहू या
आनंदाने जगू या||५||
