जीवनाचे रहस्य
जीवनाचे रहस्य
कसे उलगडावे रहस्य जीवनाचे ?
कोठुनी आलो कोठे आहे जाणार ?
कधी सुरुवात होईल या प्रवासाची ?
कधी जीवनाचा हा प्रवास संपणार ?
कसा हा जन्म काय करावे जन्मून ?
काही मिळेल ?की मिळवावे लागणार ?
कधी सुटतील हे असंख्य प्रश्नांचे जाळे ?
की त्या सरणा संगे जळून जळणार ?
काय शोधण्या आलो ?कधी सापडणार?
कसे सुख मिळेल ?कधी दुःख संपणार ?
स्वप्नाच्या मागे धावताना कधी अचानक
आपणच एक सप्न बनून नाही ना राहणार ?
कसं शोधावं ते रहस्य जन्म मृत्यूचे ?
कसा आयुष्याचा हा अंत थांबवणार ?
पिकलेले पान एकदा गळून पडल्यावर
पुनर्जन्म म्हणून तेच नव्या पालवीत जन्मणार...?
