पाऊस
पाऊस
आला घालीत शीळ
सुरू वर्दळ वाऱ्याची
ढगांनी ही केली गट्टी
ती चाहूल पावसाची
किलबिलाती पक्षी
घरट्याकडे परतले
प्राणी वनी बोकाळले
रान सारे दुमदुमले
मेघनाचा तो निनाद
कडाडली सौदामिनी
धरणीला भेटाया आली
वर्षा राणी ती धाऊनी
आल्या पाऊस धारा
संग घेऊन गारवा
शहाराली झाडे वेली
साज चढला हिरवा
निज मातीत घेणारं
जागं झालं ते बियाणं
येईल अंकुर त्याला
होईल हिरवं माळरानं
सृष्टी झाली ही आनंदी
बघ तुझ्या आगमनाने
खरी नटेल ही धरती
आज तुझ्याच कृपेने
