STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Drama Others

3  

सचिन विश्राम कांबळे

Drama Others

प्रवास आयुष्याचा

प्रवास आयुष्याचा

2 mins
146

आयुष्य हे

एक प्रवाह नदीचा

आईच्या गर्भात फुलतो

मधुर आवाजात उगम पावतो

नियतीच्या चक्रा नुसार जन्म घेतो


खलखळणाऱ्या झऱ्यागत

खेळतो नाचतो बागडतो उड्या मारतो

बालपणाचा आस्वाद घेऊन

मनमौजी जगतो

छोट्या छोट्या साखळीने प्रवाह बनतो


अनेक छोटे मोठे ओढे

येऊन मिळतात

त्यात रमतो गमतो

बेधडक तरुणाईची बेधुंद मिजास जगतो

खूप मोठा प्रवाह बनतो


प्रत्येक वळणावर चढ उतार मिळतात

असंख्य बाधांचा अवरोध भेदून

एक नवीन संथ शीतल निर्मळ

प्रवाहाच्या शोधात निघतो


काटे कुटे पोटात घेऊन

प्रत्येक मार्ग मोकळा करत

एक नवजिवनात प्रवेश करतो

डोह स्वरूपात

कुठे तरी जाऊन थांबतो अन् शांत होतो


खूप खोल डोह

त्यात भावना प्रेम काळजी लपलेली असते

कोणी त्याची खोली सांगु शकणार नाही

त्या भावना,प्रेम काळजी ओळखू शकणार नाही

कारण तो शांत पुढच्याप्रवासाची तयारी करत असतो


पुढे संथ वाहत वाहत

हळू हळू गती ती मंद होते

अन् प्रवास इथेच संपतो

शेवट त्या सरणावर होतो

प्रवाह सागरात विलीन होतो.....


शेवटी तुम्हाला देऊन जातो

दगड,वाळू बाष्प पाऊस पाणी

उदरनिर्व्हाचा बंदोबस्त करुन ठेवतो

धन संपत्ती,पैसा

इथेच सोडतो तुमच्या भविष्यासाठी

जे त्यांनी कमवलेला असतो


प्राणहीन देह तो ही

भक्ष म्हणून छोटे जीव किडे यांच्या स्वाधीन करून

कुटे तरी पुण्य करतो

किंवा राख होऊन या मातीत मिसळून जातो

घेऊन जातो तो फक्त प्राण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama