STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Abstract Drama

3  

Kavita Sachin Rohane

Abstract Drama

असं काहीच नाही

असं काहीच नाही

1 min
136

प्रत्येक नातं आनंदाने स्वीकारते

 विचार करत बसत नाही......

पण तरी प्रत्येकाला माझ्याशी नातं टिकवायचच असेल.....

असं काहीच नाही.....


प्रत्येकाचे अश्रू पुसते...

त्यातून मला मिळतो आनंद.....

पण प्रत्येकाकडून काही अपेक्षा असेल

असं काहीच नाही...


स्वतःकडे दुर्लक्ष करते.

पण सगळ्यांची काळजी मात्र मी घेते......

तरीही सगळ्यांना चांगलीच मी वाटत असेल.

असं काहीच नाही......


जगावेगळी असेल कदाचित....

चुकत पण असेल.......

 पण प्रत्येक वेळी माझीच चूक असेल

असं काहीच नाही......


समजदारी दाखवायची सगळ्यांनसाठी

पण सगळे मला समजून घेतील

असं काहीच नाही.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract