STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Classics Inspirational Others

4  

Kavita Sachin Rohane

Classics Inspirational Others

​विठू माऊली बोले भक्ता..

​विठू माऊली बोले भक्ता..

1 min
0

​विठू माऊली बोले भक्ता..
म्हणे माझी विठू माऊली, घे नाम मुखी हरी,
अरे भोळ्या भक्ता विसरू नको सत्कर्माची वारी. // १ //
​येतो माझ्या चरणी घरदार तुझे सोडुनी,
कर काही त्यांच्यासाठी ज्यांची घरी गेली मोडूनी. // २ //
​मूक प्राण्यांशी जवळी घे, धर सत्कर्माचा वसा,
होईल मज हर्ष अपार, जर वागलास तू असा. // ३ //
​अहंकारातले मोहजाळ तोडून पुस दु:खीतांचे आसू,
परोपकाराने तुझ्या येऊ दे गरजूंच्या मुखावर हसू. // ४ //
​ठेव एक ध्यास मनाशी, मिळूनी सर्व सावरू,
मी तेथेच सापडेल तुला, नको तू घाबरू. // ५ //
​✍️ कविता रोहणे
सातारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics