STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Action Fantasy Others

4  

Kavita Sachin Rohane

Action Fantasy Others

आवडेल मला

आवडेल मला

1 min
3



आवडेल मला स्वतःशीच
मैत्री करायला
स्वतःशीच मनसोक्तपणे
गप्पा मारायला//१//

आवडेल मला माझच मन 
माझ्याशी मैत्री करत असेल 
आणि त्याला माझ्यावर
संशय कुठला नसेल//२//

आवडेल मला मनातल्या गोष्टी  
स्वतःला सांगून खळखळून हसायला
तर कधी ढसाढसा रडायला//३//

आवडेल मला जर माझीच
माझ्याशी मैत्री झाली 
आणि मीच माझी जिवलग मैत्रीण
म्हणून बनून आली//४//

आवडेल मला स्वतःची सुखदुःख 
स्वतःशी वाटून घ्यायला
आणि स्वताच स्वतःला 
खंबीर आधार द्यायला//५//


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action