भेटीसाठी मन
भेटीसाठी मन
*
भेटीसाठी मन
आतूरले देवा
सांग कधी घडेल
तुझ्या चरणाची सेवा//१//
तुझे रूप
ध्यानी वसे
बाकी मला
काही न दिसे//२//
नाम तुझे
येता ओठी
तुटती जन्म-
मरणाच्या गाठी//३//
दर्शन तुझे होता
आनंदाश्रू डोळी येती
सारी दुःख माझी
दूर पळून जाती//४//
हाक कधीतरी देशील
हीच एक आशा
कळे तूज माऊली
वेड्या भक्तीची भाषा//५//
