STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Romance Tragedy Others

4  

Kavita Sachin Rohane

Romance Tragedy Others

नको ते बंधन 

नको ते बंधन 

1 min
1


 
लग्नाच्या त्या बंधनाशिवाय
 एकत्र राहणं आम्ही स्वीकारलं 
समाजाच्या चौकटी बाहेर पडून
 एक वेगळं जग 
आम्ही आकारल//१//
न अक्षदांचा थाट
 न सनई- चौघड्यांचा सूर 
दोन मनांची संमती 
आणि सोबतीला 
प्रेम होतं भरपूर//२//
कसलं हे नातं असा प्रश्न
 सतत होता साऱ्यांचा 
कुणाला काय सांगणार? 
धागा जुळला होता 
आपुलकीचा//३//
नसेल कपाळावर कुंकू 
व गळ्यात काळे मणी
 पण प्रत्येक माझ्या सुखात
 तीच आहे माझी धनी//४//
लिव्ह- इन च्या या जगात
 विश्वासाला मोठी आहे किंमत
 मनमोकळेपणाने जगायच
 हीच तर आहे 
याची खरी गंमत//५//
✍️ ksr
 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance