कुठे हरवली हिरवळ
कुठे हरवली हिरवळ
कुठे हरवली हिरवळ
कुठे हरवली ही हिरवळ काही कळेना
शोध घेऊनी चोहीकडे
कुठेही सापडेना//१//
तिची जागा आता सिमेंट- काँक्रीटच्या घरांनी घेतली म्हणे
स्वतःच्या स्वार्थासाठी माणसांनी तोडली ही वने//२//
श्वास या वसुंधरेचा चाललाय हो घुटत
माणसाची ए.सी.पुढे बसायची सवय नाही सुटत//३//
देवाने रचलेला सुंदर निसर्ग होतोय आता उध्वस्त
प्राणी आणि पक्षी तर
पार झालेत त्रस्त//४//
हिरवळी सोबतच हरवलाय तो गारवा
वाऱ्यासोबत कधीतरी
फिरायचा हो तो पारवा//५//
✍️कविता रोहणे
सातारा
