वारी पंढरीची
वारी पंढरीची
चालती पाऊले वाट पंढरीची|
सोडुनिया ओढ संसाराची ||
पताका घेऊन हाती |
नाचे वारकरी||१||
कपाळी चमके सुगंधित बुक्का |
हृदयावर असे विठ्ठलाचा शिक्का ||
विठू नामाचा गजर |
रंगे चोहिकडे||२||
टाळ- मृदुंग करती नाद|
सावळा विठुराया देतो साद||
ना तहान-भूक आठवे |
भक्तीत माऊलीच्या||३||
उभा असे तो विटेवरी|
भक्त जणांचे कष्ट हारी ||
ठेवीते मस्तक चरणी|
अभंगातून माझ्या ||४||
,
