STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Drama Romance Tragedy

4  

Kavita Sachin Rohane

Drama Romance Tragedy

साथ तूझी

साथ तूझी

1 min
1

साथ तूझी.. 
ना छप्पर डोक्यावर,
ना हक्काचे अंगण
झाडाच्याच सावलीत,
सजले छोटेसे रिंगण//१//
ना भारी कपड्यांची आशा, 
ना मोठ्या दागिन्यांचा थाट
आणि काय हवय मला
असतांना तुझा हातात हात//२//
ना कुठला दिखावा, 
ना पंचपकवान्नाची थाळी
तुझ्या हातची चटणी भाकरी
 लय मला भाळी//३//
ना राजेशाही बघितली, 
ना कधी राजा बनलो
एकमेकांच्या साथीनेच
 कायम आपण जगलो//४//
ना चालायला पायात वहाण, 
ना माहिती दिवस वार
सांगतो सखे तुला
आपणच आपले आधार//५//
✍️कविता रोहणे 
सातारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama