क्षण आनंदाचे
क्षण आनंदाचे
क्षण आनंदाचे
आठवणीत माझ्या
कायमस्वरूपी असणारे
क्षण आनंदाचे
मना वेधून घेणारे//१//
क्षणभंगुर ते परी
ओठांवर हसू देणारे
क्षण आनंदाचे
फुलांसम सुगंधित भासणारे//२//
कल्पित कधी
अकल्पित पणे मिळणारे
क्षण आनंदाचे
सुखाची भाषा शिकवणारे//३//
जल्लोषात सर्वाना
रममाण करणारे
क्षण आनंदाचे
वेडावून टाकणारे//४//
✍️कविता रोहणे
सातारा
