STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

भरकटलेलं मन...

भरकटलेलं मन...

1 min
231

भरकटलेलं मन        

येत नाही थार्यावर,      

कधीही येत राहते       

अनाहूत भावनांची सर...  

भरकटलेलं मन        

हाेत नाही कधी स्थिर,   

विचारांचे वारू         

वाहतात कसे भीर भीर...  

भरकटलेलं मन

कधी करतं अविचार, 

भरकटलेल्या मनावर

आहेत का खात्रीने उपचार.... 

भरकटलेलं मन

बिघडवताे मनाचा ताळेबंद, 

कधी येईल का मनात

पूर्वीसारखा निरपेक्ष आनंद.... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics