आई वडील माझे देव
आई वडील माझे देव
आई वडीलांची हो माया थोर
आपलं लेकरू वाटे रानातल सुंदर मोर
आई वडीलांनी दिला जीवनाला आकार
केले लेकराचे जीवन साकार
आपली लेकरे त्यांना वाटे गुलाबाची फुले
बाळ पहिल्यांदा चालल्यावरी मन आनंदाने झुले
आई वडीलांची माया पेढ्यासारखी गोड
आहेत त्यांच्याजवळ सर्व प्रश्नांचे तोड
आई वडीलांना नाही कुणाचा हेवा
करा त्यांची जन्मभर सेवा
त्यांनी केले लेकरासाठी खूप कष्ट
नका करू त्यांना कधी रुष्ट
केले लेकराचे जीवन तुम्ही साकार
दिले लेकराला देवासारखे संस्कार
आई बाबा जशी चिमणी जाते उडून
तसं तुम्ही नाही जायचं लेकरा सोडून
