STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

श्रावण मास..

श्रावण मास..

1 min
279

सुरू झाला श्रावण मास, 

संस्कृती आहे आमची खास, 

बेलाचे पान वाहताे महादेवास, 

सदा सुखी ठेव प्रियजनास.... 

सुरू झाला श्रावण मास, 

शिवशंकर भक्तीचा बहार, 

तिच शक्ति हाेते तारणहार, 

त्यामुळे हाेईल भवसागर पार... 

सुरू झाला श्रावण मास, 

घ्यावा शिवशक्तीचा ध्यास, 

धरावी सद्गविचारांची कास, 

पसरावा आराधनेचा सुवास... 

सुरू झाला श्रावण मास, 

आेळखावा हा सोमनाथ, 

भक्तिशक्तीचा एकमेव काथ, 

देईल तुम्हा आम्हा ताे साथ... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics