STORYMIRROR

Jayesh Mestry

Classics

4  

Jayesh Mestry

Classics

गाव सारा उजळून गेला

गाव सारा उजळून गेला

1 min
448

रामाच्या पारी वासुदेव आला

गाव सारा उजळून गेला

वासुदेव आला हो वासुदेव आला


वासुदेव गातो देवाचं गाणं

खुल्या मनानं करावं दान

दान पावलं, आनंद झाला

रामाच्या पारी वासुदेव आला...


मधूर किती पक्ष्यांची वाणी

घाल माय जरा तुळशीला पाणी

सोन-किरण घेऊन सूर्य उगवला

रामाच्या पारी वासुदेव आला...


गावातली माणसं लई भोळी

जेवणाला रोज कांदा नि पोळी

अमृत वाटतो पाण्याचा प्येला

रामाच्या पारी वासुदेव आला...


गावाची व्यथा काय सांगू राव

पाण्यासाठी मोठ्या कोसावर धाव

भविष्याचा कुणी न इचार केला 

रामाच्या पारी वासुदेव आला...


इंटरनेट फिंटरनेट कुणा न ठाव

इथल्या लोकांना न कसली हाव

मोबाईलच्या रेंजचा घोळच झाला

रामाच्या पारी वासुदेव आला...


जागा हो माणसा, वेळ फार झाला

पुढारलं शहर, गाव मागं राहिला 

देवाचा निरोप घेऊन वासुदेव आला

रामाच्या पारी वासुदेव आला...


रामाच्या पारी वासुदेव आला

गाव सारा उजळून गेला

वासुदेव आला हो वासुदेव आला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics