पाऊस
पाऊस
1 min
142
पाऊस
दलितासारखा
देवळाबाहेर आक्रंदून कोसळणारा...
पाऊस,
यवनांसारखा
बेचिराख करणारा...
पाऊस,
बुद्धासारखा
अंकुर फुलवणारा...
पाऊस,
विर्यासारखा
ओसंडून वाहणारा...
पाऊस,
आईच्या स्तनातील झरा
अमृततुल्य...
पाऊस,
आठवणींच्या गर्भातून
डोळ्यांमध्ये तरळणारा...
पाऊस,
कृष्णासारखा
सर्वत्र...
