वंदे मातरम
वंदे मातरम
चला गाऊया वंदे मातरम.
सारे गाऊया वंदे मातरम.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
स्वातंत्र्य लढ्याचा हा मंत्र खरा.
त्या वीर हुतात्म्यांच्या स्मृती स्मरा.
म्हणा जोडुनी आपुल्या दोन्ही करा.
देव मंत्रांहुनी आम्हास पूज्य परम.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
चला गाऊया वंदे मातरम.
सारे गाऊया वंदे मातरम.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
मातृभूमीचे हे पुण्य स्तोत्र.
आम्हा भारतींचे एकची गोत्र.
या मातीत घडले थोर चरित्र.
मातृभूमीला अर्पण सारे करम.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
चला गाऊया वंदे मातरम.
सारे गाऊया वंदे मातरम.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
चला फडकवू तिरंगा एकात्मतेचा.
चला पेटवू सूर्य विश्व-बंधुत्वाचा.
चला उजळू आसमंत सामर्थ्याचा.
भारती अमुची जात, भारती अमुचा धरम.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
चला गाऊया वंदे मातरम.
सारे गाऊया वंदे मातरम.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.