STORYMIRROR

Jayesh Mestry

Tragedy

4  

Jayesh Mestry

Tragedy

भाकरीचा चंद्र...

भाकरीचा चंद्र...

1 min
946

आभाळाच्या थाळीत

भाकरीचा चंद्र

पुन्हा उपाशी राहिला 

कष्टाळुंचा इंद्र.


पिचलेल्या पोटावरुन 

त्याने उजवा हात फिरवला

नशिबाने पुन्हा

कालचाच कित्ता गिरवला.


उपाशी झोपली बायको

उपाशी झोपली लेकरं

ह्यांच्यापेक्षा सुखी

चिखलातली डुकरं.


दुसऱ्या दिवसापासून

तिने पदर खाली पाडला

लेकरं पोटभर जेवली

तो दारू पिऊन पडला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy