STORYMIRROR

गीता केदारे

Classics

4  

गीता केदारे

Classics

आषाढ घन.. (पाऊस, आठवण, ढग)

आषाढ घन.. (पाऊस, आठवण, ढग)

1 min
682


धुंद पावसाच्या सरींना

सामावून बाहुपाशात

सौदामिनीचं घनमन चांदणं

लख्ख पसरलं मळभात... 


पोळलेल्या वसुंधरेवर 

अलवार शिंपडल्या मृगसरी 

 झालं मन हिरवं विरहिणीचं

 सजली आरास सुखद अंतरी ... 


झाले गात्र गात्र प्रफुल्लित 

ओली धरती कावरीबावरी 

येता मिलन बहर क्षण 

बरसली बरसात लाजरी... 


कोसळून धुवाधार भिजली 

दरवळला मातकट सुगंध 

गुंतले मन आठव आंदणात  

मिलनास न उरले कसलेच बंध... 


प्रेमरंगी स्पर्शाचा खुलासा 

नटले इंद्रधनूने नभोमंडप

 उमटली अलगद प्रकाश लकेर

 धुंद पावसात भिजण्याची रंगत... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics