STORYMIRROR

Vinita Kadam

Classics

4.0  

Vinita Kadam

Classics

कोकिळ

कोकिळ

1 min
311


(अष्टाक्षरी )


सूर येता प्रभातीचे

करी कोकिळा कुंजन

कमळाच्या पाकळीत

करी भ्रमर गुंजन||१||


तान सुरेल खेचता

जाग येई रानफुला

सोनसळी प्रकाशात

होई आसमंत खुला||२||


कोकिळेचे मधुगान

देई साद ऋतुराज

वाहे चैतन्याचे वारे

सृष्टी होई सरताज||३||


आवाजाची मधुरता

फुलविते आमराई

मोहोराच्या सुगंधाने

कळी खुले रानजाई||४||


महोत्सव गंधर्वाचा

वसंतात मोहरला

विविधांगी नानारंगी

आसमंती बहरला||५||


शीळ घाली पानाआड

बासरीची लावी तान

सप्तरंगी सप्तसूर

वृक्ष, वेली नसे भान||६||


गर्व नसे कोकिळेस

रोज गाई नवे गाणे

स्वजनांच्या सुखासाठी

छेडी मधुर तराणे||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics