शस्त्र लेखणी (पंचाक्षरी)
शस्त्र लेखणी (पंचाक्षरी)

1 min

225
मूर्ती लहान
किर्ती महान
तिला पाहता
मिटे तहान
करता स्पर्श
मिळतो हर्ष
पारसमणी
भेटे सहर्ष
रुप सोज्ज्वळ
परी निर्मळ
सदा सोबत
तो परिमळ
संगे विज्ञान
दूर अज्ञान
शस्त्र लेखणी
होशी सज्ञान
स्वप्न संस्कार
करी साकार
शब्दाक्षरास
देई आकार
लेखणी शस्त्र
दुधारी अस्त्र
योग्य वापर
करी सर्वत्र