Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vinita Kadam

Inspirational Others

3  

Vinita Kadam

Inspirational Others

भाऊराया

भाऊराया

1 min
294


आली सोनेरी पहाट

संगे रक्षा बंधनाची

असे नवीन नव्हाळी

नवलाई विचारांची||१||


दिन आज मांगल्याचा

आठवण भाऊराया

होई कासावीस जीव

येई औक्षण कराया||२||


आज राखी पौर्णिमेचे

बंध रेशमाचे जाण

लाभो चिरायुष्य त्यास

हेच देवीशी मागणं||३||


भाऊ येई माझ्या घरा

तोचि दिवाळी-दसरा

वाटे आले सुख दारी

माझ्या माहेरचा वारा||४||


भाऊ-बहीण प्रेमाचा

आज सोनियाचा दिन

राहो सुखे दूर देशी

घट्ट नात्याची ही वीण||५||


लाख मोलाचा गं भाऊ

वेड्या बहिणीची माया

प्रेम राहो निरंतर

ओवाळीते भाऊराया||६||


Rate this content
Log in