Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vinita Kadam

Others Children

4  

Vinita Kadam

Others Children

लहानपण

लहानपण

1 min
97

आईच्या मागे लागायचे

आठवडी बाजारात जाताना

गोंधळ करुन रडायचे

मी लहान असताना||१||

तिच्या बरोबर असताना

आनंदाने बागडायचे

गर्दीत भरभर चालताना

धरलेले बोट निसटायचे||२||

मग आई चिडून द्यायची

हळूच पाठीवर धपाटा

म्हणे आलीच आहेस कार्टे

माझ्या बरोबर चाल पटापटा||३||

बाजारी गेल्यावर खायला

देई चिक्की, राजगिऱ्याचा लाडू

बोले दादाजवळ चुकूनसुद्धा

याचे नाव नको काढू||४||

खेळताना एक दिवस

दोघांची भांडणे झाली

दादाला चिडवताना मीच

चिक्कीची गोष्ट घरभर केली||५||

गाल फुगवून दादाने

मागितला चिक्की व लाडू

वैतागून बाबांनी दिला

दोघांना धम्मक लाडू||६||

आई मुळातच असते प्रेमळ

तिने पटकन गोड पापा घेतला

तिचे गोड हसू पाहून आम्ही

चिक्कीचा तंटा सोडून दिला||७||

आई फक्त माझी हीच 

निरागसता म्हणजे बालपण

तिच्या सहवासाकरिता देवा

मिळेल का पुन्हा लहानपण?||८||

Rate this content
Log in