प्रार्थना
प्रार्थना

1 min

46
दैवत अनादी अनंत
आरंभपती श्री गणेश
स्वयंसिद्ध प्राणस्वरूप
आद्य उपाधी परमेश..||१||
सर्वप्रथम पूजनीय
रूप ॐकार निर्गुणाचे
ब्रह्मणस्पती देवतेचे
प्रतीकात्मक सगुणाचे..||२||
वाहते ही कवन जुडी
लाभे प्रसाद गजानना
आशीष द्या मम पामरा
हेरंबा तू गजवदना..||३||
विघ्ने नाशवी विघ्नहर्ता
एकदंता सिद्धिदायका
दान मागे आता विनिता
अंबिका पुत्र विनायका..||४||
चिंता हरतो चिंतामणी
वाचस्पती तू बृहस्पती
पाशांकुश तू निजदंत
त्रिशूलधारी गणपती..||५||