उजेड पेरु
उजेड पेरु


(अष्टाक्षरी)
चला उजेड हा पेरु
विजयाचा तेजोमय
दिवा लावूनिया जगी
होई जसा सुर्योदय||१||
ज्योत निघे रात्रीतून
लढे अदृश्य शत्रुशी
बळ दाखवी एकीचे
नाते हे मानवतेशी||२||
जीर्ण वस्त्र टाकूनिया
सोडी जीणे लाचारीचे
तोडू आता कंबरडे
भ्रष्टाचार, अन्यायाचे||३||
दिवा पेटवू ज्ञानाचा
अज्ञानाच्या अंधारात
तेव्हा होईल सज्ञान
साक्षरता समाजात||४||
पुण्य शिकवू दानाचे
करुनिया रक्तदान
धरु सत्याचीच कास
मिळे त्यास सर्व मान||५||
दान द्यावे गजानना
सकलास आरोग्याचे
दूर करी अंध:कार
ध्येय पूर्ण जीवनाचे||६||