गणेश चतृर्थी
गणेश चतृर्थी


आई गणपती बाप्पा आले
लहानपणी असायची माझी आरोळी
फटाक्याच्या आवाजात बाप्पाचे घरी स्वागत होई
बाप्पाला मखरात पाहण्याची असायची माझी घाई
बाप्पाची पूजा करायला असायची मी पहिली
बापाच्या पायावर फुल ठेऊन वाटे मनाला शांती
बाप्पाच्या नेवेद्यासाठी मोदकाचे ताट रेडी
मग सगळ्यांबरोबर सहभोजनाचा आंनद येई
फुगड्याचा ताल सगळेच धरी
आरती संध्यकाळची जोरात होई
प्रसाद म्हणून मग लाडू आणि करंजी
मग असे फटाक्याची रोषणाई
सात दिवस असे बाप्पा आमच्या घरी
रडू येई मला विसर्जनाच्या वेळी
अशी साजरी होई माझ्या लहानपणीची गणेश चतृर्थी
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी