Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shivam Madrewar

Classics Inspirational

3  

Shivam Madrewar

Classics Inspirational

का कोणास ठाऊक

का कोणास ठाऊक

1 min
50


का कोणास ठाऊक,

आज त्या रस्त्यावरती थांबावेसे वाटले


त्या पक्ष्यांच्या थव्यामध्ये,

उडणाऱ्या चिमुकल्या पक्षाचे कौतुक करावेसे वाटले


त्या तनाच्या पानावरती,

दवबिंदू बनून मोत्यासारखे चमकावेसे वाटले


का कोणास ठाऊक,

त्या निर्सगाचे अनमोल ऋण फेडावे वाटले


का कोणास ठाऊक,

त्या गच्चीवरती उभे राहावेसे वाटले


गगनचुंबी इमारतींकडे पाहुन,

उंच गगनभराऱ्या घ्यावेसे वाटले


त्या सुर्यदेवतेकडे पाहुन,

त्याच्यासारखे प्रकाशित व्हावेसे वाटले


का कोणास ठाऊक,

आकाशाकडे पाहुन आंतराळवीर व्हवेसे वाटले


का कोणास ठाऊक,

अचानकपणे मंदिरात जावेसे वाटले


लंबोदर गणरायाकडे पाहुन,

आईसाठी आयुष्य मागावेसे वाटले


छोट्याशा उंदीरमामाकडे पाहुन,

माझ्या मित्राला मैत्रीचे व्याख्यान द्यावेसे वाटले


का कोणास ठाऊक,

दिवसभर विघ्नहर्त्याच्या पायात राहुन सेवा करावेसे वाटले


का कोणास ठाऊक,

अचानकपणे एकटेच भटकावे वाटले


त्या अनाथ/पोरक्या मुलांकडे पाहुन,

खूप-खूप मदत करुन आनंद पसरवावेसे वाटले


त्या युद्धाच्या नद्या पाहुन,

‘युद्ध’ हा शब्दच कायमचा मिटवावेसे वाटले


का कोणास ठाऊक,

अचानकपणे त्या परमेश्वराचे आभार 

व्यक्त करावेसे वाटले


का कोणास ठाऊक,

त्या वाचनालयात राहावेसे वाटले


त्या भल्या मोठ्या पुस्तकांकडे पाहुन,

साहित्याच्याच विशाल विश्वात हरवावेसे वाटले


या अनेख्या पृथ्वीतलाकडे पाहुन,

ज्ञानाच्या त्या सागरात डुबकी मारावेसे वाटले


का कोणास ठाऊक,

शेवटी जे मिळाले त्याचे फक्त आणि फक्त आभारच मानावेसे वाटले


Rate this content
Log in