STORYMIRROR

Shobha Wagle

Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Classics Inspirational

आनंदी आनंद

आनंदी आनंद

1 min
172


ऋतू आला पावसाळा

धरतीला सजवाया

हिरवाई फुलवुनी

शालू भू ला नेसवाया


काळे मेघ बरसता

झाली ओली चिंब धरा

कोंब फुटले उदरी

वाहे खळखळ झरा


ताजी तवानी धरती

मेघ राजास नटली

नव युवती समान

मिलनास आतुरली


शालू हिरवा धरेचा

कड्या कपारी भरला

धबधबे ते पाहुनी

हर्ष मनीचा फुलला


सृष्टी बदल क्षणात

मनोहारी तो दिसला

शेतकरी तो शिवारी

शेती कार्यास लागला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics