शिव महिमा
शिव महिमा


नागोबाच्या फण्याने
वेढलेली मान
तिसरा डोळा
शोभे छान
निवासस्थान हे
कैलास पर्वतावरी
चांदोबा वसे
त्यांच्या डोक्यावरी
विषप्राशन केले
विष्णुला स्मरून
कीर्ती पसरली
नीलकंठ म्हणून
पत्नी आहे
देवी पार्वती
पुत्र गणेशाची
वेगळीच महती
लांब त्रिशूळ
हाती घेऊन
शिवतांडवात जाई
भान हरपून
श्रावणमासी भक्तजन
अभिषेक करती
भक्तिभावाने व्रतवैकल्ये
पूजा मांडती
मुखी असावे
नाम शंकराचे
होई दूर
दुःख साऱ्यांचे