मंगळागौर
मंगळागौर
आला श्रावण की,
आनंद मनात मावेना,
माहेरी जाण्याचे वेध लागे,
गेल्यावाचून राहावेना
श्रावणी मंगळवारी येई,
मंगळागौरीचे पूजन,
चला गं सयांनो,
घेऊ गौराईचे दर्शन
नऊवारी साड्या घालू,
बांगड्या छान भरू,
भरपूर दागिने घालून,
गौरीपूजन करू
उखाणे घेऊ,
खोड्या काढू,
पंच पक्वान्नाचे नैवेद्य,
गौराईला वाढू
फेर धरून मैत्रिणीसंगे,
झिम्मा फुगडी खेळू,
सोळा प्रकारची पत्री वाहून,
जागरण गौराईंसाठी करू