माझ्या या देशावर
माझ्या या देशावर
1 min
303
अभिमान असे आम्हा भारताचा|
इतिहास जपतो आम्ही भूमीचा||१||
धर्म, पंथ, जाती अनेक नांदती|
त्रिसागर हे पाहा नाती जपती||२||
अभिमान हा उरात बाळगतो|
देशासाठी प्राणार्पणही करतो||३||
माझ्या या देशावर प्रेम हे माझे|
गुणगान गातो मायभूमी तुझे||४||
बारा नद्या या खळखळ वाहती|
अठ्ठावीस राज्य हरित करीती||५||
असे केंद्रशासित प्रदेश नऊ|
विविधता आहे गुणगान गाऊ||६||