लाडू
लाडू
1 min
240
कढईत घ्या साजूक तूप ,
तूपथोडे कडवावे छान,
रवा घेतला भाजून त्यात ,
त्यात आहे साखरेला मान .
दूध जरा घालावे बेताने ,
बेतानेच घालावे खोबरे,
साऱ्याचे करा छान मिश्रण ,
मिश्रात बदामाचे नखरे.
गोल गोल छान तुम्ही वळा,
वळताना घ्या दुधाचा हात,
रव्याचे लाडू तयार झाले,
झाले मंडळी केली हो मात .