वसा
वसा
1 min
221
साक्षरतेचा वसा घेतला,
शिकवण देतो प्रेमाची,
चला करूया साक्षर सर्वा,
शपथ घेतली लढण्याची.
निरक्षरतेशी लढा आमचा,
पुस्तकं पाटी हाती धरू,
शिक्षणाचा मंत्र जपतो,
अज्ञानाला दूर करू.
वसा घेऊन शिक्षणाचा,
रोज राबतो आम्ही,
फुलवितो मळा ज्ञानाचा,
विद्यार्थी घडवितो आम्ही.
