अंतरीचा ध्यास
अंतरीचा ध्यास
1 min
397
देवा आता सांग ना,
भेट कधी होणार,
तुझ्या चरणी मस्तक माझे,
कधी मी ठेवणार.
वारीला जाण्याचा,
जिवा लागला ध्यास,
अंत नको पाहू देवा,
तुझा मज होई सर्वत्र भास.
पायाखाली घे तुझ्या,
ही सगळी रोगराई,
जीवनदान डे सर्वा,
कामना हीच तुझं ठायी.
तुझ्या भेटीची ओढ,
मला लागली सारखी,
अंतरीचा ध्यास मला,
तुझ्या प्रेमाला पारखी.