चाफा
चाफा
1 min
518
(शेल काव्यरचना)
फुल फुले सुंदर
सुंदर ते चाफ्याचे
अनेक रंगात दिसती
दिसती चहूकडे
अनेक रंगात येती
येती सर्वत्र झाडावर
पानोपानी बहरती
बहरती झाडाच्या पूर्णांगावर
देवीस आवडे चाफ्याचे फुल
फुल शोभे पिंडीवर
नानाविध उपयोग तुझे
तुझे अत्तर अति सुंदर
पिठोरीला असे तुझी पत्री
पत्री लागे गौरीला
पाने गळता शोभून दिसे
दिसे फुलांचा सडा
