बाप्पा मोरया
बाप्पा मोरया

1 min

62
भाद्रपदमासे दिवस मंगल
गणराजाचे झाले आगमन
सृष्टिवर आज चैतन्य भरले
बप्पा मोरयाचे शुभ आगमन
बुद्धिची दैवता गणपती
चौसष्ट विद्येचे माहेर
आम्हा भक्तांचा कैवारी
बाळगोपाळांचा तू मोरेश्वर
मातापिताच तुम्ही जना
ब्रह्मांड दाखविले
संपूर्ण जगास तुम्ही
आज विश्व दाखविले
मुषक वाहन तुमचे
मोदक आवडी प्रसाद
भक्तांचा कनवाळू मोरेश्वर
तुमचा भक्तांना आशीर्वाद
गौरीपुत्र विनायक तुम्ही
ओझरचा विघ्नहर्ता
मोरगावचा मोरेश्वर
भक्तांचा तू दुःखहर्ता
एकदंत चतुर्थकम
पाशकुशमधारिनम
रदंचहस्त भ्रिमनन
मुषकध्वजन लबोंदरम
एकदंत तू विघ्नहर्ता
महागणपती तू गणेशा
लेण्याद्रीच्या गिरीजात्मजा
ओझरच्या विघ्नेशा
सदा वंदन गणराया आमुचे
गोड आशीर्वाद दे
उत्तम आरोग्य आम्हाला
सुख-समृद्धी आम्हाला लाभू दे
गणपती बप्पा मोरया...