STORYMIRROR

Sanjay Gurav

Classics Inspirational

3  

Sanjay Gurav

Classics Inspirational

शोध स्वतःचा

शोध स्वतःचा

1 min
266

आज स्वतःला शोधण्या निघालो

नवा रस्ता गाठीला फक्त खस्ता


कुठल्या देशी घडेल मुशाफिरी

मुक्काम कुठला तुटपूंजा बस्ता


किंमत मोठी चुकवूनही पदरात

मीच आलो शेवटी पुरता सस्ता


मीच माझ्या शोधात जागलो रातीला

मनाच्या माझ्याच भोवती अन गस्ता


सापडलो तर सोडणार नाही कदापिही

मीच मला भिडणार रोज उठताबसता


आज स्वतःला शोधण्या निघालो आयुष्या

फिरलोच ना माघारी, विसरु नकोस दोस्ता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics