STORYMIRROR

Sanjana Juwatkar

Classics

3  

Sanjana Juwatkar

Classics

अंकुर

अंकुर

1 min
238

पडे मृगाचा पाऊस

धरा झाली ओलीचिंब

प्रेमधारा त्या पिऊनी

पाही गोड प्रतिबिंब l l १l l


हुंगी परिमल मृदा

गीत आनंदाचे ओठी

रूजे अंकुर हिरवा

माय धरित्रीच्या पोटी l l २l l


कुठे वसे तो शेतात

कुठे असे रानोवनी

दगडात, डोंगरात

जन्म घेई माळरानी l l ३l l


मिळे उबारा कुणाला

होई वेल, वृक्ष, तरु

कुणी वाढे एकटेही

वाटे जगू किंवा मरू l l ४l l


मिळे खतपाणी ज्याला

फुलं, फळांचा बहर

ज्यांना पानांचाच घेर

झेली उन्हाचा कहर l l ५l l


बीज रुजवू, वाढवू

येई जीवना आकार

स्वप्न हिरवे उद्याचे

तेव्हा होईल साकार l l ६l l


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjana Juwatkar

Similar marathi poem from Classics